‘या’ कारणामुळे पाकिस्तानात दहशतवादी प्रशिक्षण घेतले, अटकेतील संशयितांचा खुलासा

INDIA

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट उघडकीस आणला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने २ पाकिस्तानी नागरिकांसह एकूण सहा दहशतवाद्यांना यांसदर्भात अटक केली. दरम्यान पाकिस्तानातून प्रशिक्षण घेऊन परत आलेले १६ जण पश्चिम बंगालमध्ये लपले असल्याची शक्यता आहे. असा दावा पकडलेल्या संशयित दहशतवाद्यांनी केल्याची माहिती समोर येत आहे.

यावेळी या संशयित दहशतवाद्यांनी पैशांसाठी नाही तर जिहादसाठी आम्ही पाकिस्तानला प्रशिक्षण घेण्यासाठी गेलो होतो. असे म्हटले आहे. समीर कालिया उर्फ जान मोहम्मद शेख याने दक्षिण मुंबईतील गिरगाव चौपाटी, मरिन ड्राईव्ह परिसराची रेकी केली होती. तसेच अनेक वेळा त्याने मुंबईतील उपनगरीय रेल्वे स्थानकांची तपासणीही केली होती, अशी माहिती समोर येत आहे.

पोलिसांकडून या संशयित दहशतवाद्यांकडून तपासणी सुरु आहे. यादरम्यान नवनवीन माहिती समोर येत आहे. जान मोहम्मद शेख कोटा येथून दिल्लीच्या दिशेने जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. जान मोहम्मद शेख हा कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिम याच्याही संपर्कात होता, अशी माहिती मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या