भारताचे स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकत नाही, मसूद अजहर बरळला

blank

टीम महाराष्ट्र देशा : भारत सरकारने कलम ३७० हटवल्यानंतर सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. जागतिक स्तरावरदेखील भारताच्या या निर्णयाचं स्वागत केले आहे. भारत सरकारच्या या निर्णयावर पाकिस्तानने मात्र तिखट प्रतिक्रिया दिली होती. अशातच आता पाकिस्तानी दहशतवादी मसूद अझहर यानेही कलम ३७० वर प्रतिक्रिया दिली आहे.

मसूद म्हणाला की, ‘कलम ३७० हटवल्यानंतर कश्मीरचे विशेष अधिकार संपले. अंबानी, मित्तल, जिंदाल सारखे हिंदू भांडवलदार संपूर्ण कश्मीर विकत घेतील आणि उद्योगधंद्यातून अमाप पैसा कमवातील. यामुळे मुस्लिम कश्मीरमधून आपले अस्तित्व गमावून बसतील.’ परंतु भारताचे हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही असे अझहरने आपल्या संदेशात म्हटले आहे.

तसेच पुढे बोलताना त्याने ‘या निर्णयामुळे कश्मीरमधील जिहादचा एक अध्याय पूर्ण झाला आहे. कश्मीरबाबबतीत भारताची कुठलीच स्वप्न पूर्ण होणार नाहीत. कलम ३७० हटवल्याने मोदींनी आपला पराभव ओढून घेतला आहे असंही त्याने म्हटले आहे. त्यामुळे दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानला आणि त्याच्या दहशतवाद्यांना कलम ३७० हटवल्यामुळे मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, भारत सरकारने मोठा निर्णय घेत जम्मू काश्मीरविषयीचे बहुचर्चित कलम ३७० रद्द केले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे जम्मू काश्मीरला मिळणारे विशेषाधिकार आता संपले आहेत. मोदी सरकारच्या या निर्णयाच सगळीकडून अभिनंदन करण्यात येत आहे. यात अमेरिका, रशिया आणि चीनचाही समावेश आहे.