पुलवामामध्ये दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला, ४ नागरिक जखमी

pulwama

श्रीनगर – पुलवामा जिल्ह्यात पुन्हा दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी हँड ग्रेनेड फेकून हा हल्ला केला आहे. या हल्ल्यात ४ नागरिक जखमी झाले आहेत. जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा दलांनी ही माहिती दिली आहे. पुलवामातील एका चौकात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या वाहनाच्या दिशेने हँड ग्रेनेड फेकला. पण हा ग्रेनेड रस्त्याच्या बाजूला जाऊन फुटला.

पुलावामा चौकातील सुरक्षा दलाच्या वाहनावर दहशतवाद्यांनी दुपारी हातबॉम्ब फेकला. मात्र, हा हातबॉम्ब रस्त्याच्याकडेला फुटला. जखमी झालेल्या नागरिकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी परिसराची नाकाबंदी केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर हातबॉम्ब फेकण्याच्या घटनेत वाढ झाली आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात शहरातील छानापोरा भागामध्ये हातबॉम्बच्या हल्ल्यात दोन महिलांसह तीन जण जखमी झाले होते. सुरक्षा दलाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील परीमपिरा-पँथाचौक या ठिकाणावरून 6 हातबॉम्ब निकामी केले आहे. हे हातबॉम्ब दहशतवाद्यांनी पेरलेले होते.

महत्वाच्या बातम्या