अफगाणिस्तानमध्ये दहशतवाद्यांचा मशीदीवर हल्ला; २० ठार

काबुल : अफगाणिस्तानमधील काबुल येथील एका शिया मशीदीमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २० जण ठार झाले असून ५० जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये मोठ्या प्रमाणात लहान मुलांचा समावेश आहे.Kabul mosque attack

मृतांमध्ये अफगाणिस्तानच्या शिया मौलवी परिषदेचे सदस्य मीर हुसेन नासिरी यांचाही समावेश आहे. या हल्ल्याची जबाबदारी ‘इसिस’ने घेतली आहे.

Kabul mosque attack

राष्ट्रध्यक्ष अशरफ गनी यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून दहशतवादी धार्मिक स्थळांना लक्ष्य करून हल्ले करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या हल्ल्यात जखमींची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे, असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.

Kabul mosque attack

You might also like
Comments
Loading...