जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून पोलीस पथकावर हल्ला; दोन पोलीस शहीद

श्रीनगर: रमजानच्या महिन्यात जम्मू काश्मीरमध्ये लष्कराला केंद्र सरकारकडून शस्त्रसंधीचे आदेश देण्यात आले आहेत. तुम्ही स्वतःहून शस्त्रसंधीचे उलंघन करू नका, मात्र दहशतवादी हल्ला झाल्यास चोख प्रत्युत्तर द्या असं देखील या आदेशात म्हंटले आहे.

दरम्यान केंद्र सरकारच्या या आदेशामुळे रमजानच्या महिन्यात दहशतवाद्यांकडून भारतीय जवानांवर होणाऱ्या हल्ल्यात वाढ झालीये. आज पुन्हा एकदा जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात पहाटे दहशतवाद्यांनी कोर्टाच्या आवारात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांच्या पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात दोन पोलीस शहीद झाले तर तीन जखमी झाले असून त्यांना त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या गोळीबारानंतर दहशतवाद्यांनी पोलिसांकडील बंदूक घेऊन पळ काढला. त्यानंतर परिसराला सैन्य आणि जम्मू काश्मीरच्या पोलिसांच्या पथकानं वेढले असून परिसरात सध्या शोधमोहीम राबवली जातीये.

You might also like
Comments
Loading...