fbpx

अमेरिकेवर मोठा दहशतवादी हल्ला;ट्रम्प संतापले

new yk

न्यूयॉर्क : अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील मॅनहटनमध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात ८ जणांचा मृत्यू झाला असून ११ जण जखमी झाले आहेत. वर्ल्ड ट्रेड सेंटर स्मारकाजवळ सायकलस्वारांसाठी राखीव असलेल्या मार्गावर हा हल्ला झाला. दहशतवाद्याने या मार्गावर ट्रक चालवत अनेकांना चिरडले. यानंतर त्याने ट्रकबाहेर उडी मारुन पळण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्याच्यावर गोळी झाडली आणि त्याला ताब्यात घेतले.

Manhattan Shooting
A paramedic looks at a body covered under a white sheet along a bike path, Tuesday Oct. 31, 2017, in New York. (AP Photo/Bebeto Matthews)

अमेरिकेतील या हल्ल्यात कोणत्या दहशतवादी संघटनेचा हात आहे, हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये. याआधी आयएस या दहशतवादी संघटनेने ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीमध्ये हल्ला केला होता. मात्र हा हल्ला आयसीसने केला की नाही हे अजून स्पष्ट झालं नाहीये.सायकलस्वारांसाठी राखीव असलेल्या मार्गावर अनेकांना चिरडल्यावर दहशतवाद्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पाठलाग करणाऱ्या पोलिसांना भीती दाखवण्यासाठी त्याने खिशातून दोन बंदुका बाहेर काढल्या. मात्र त्या दोन्ही बंदुका बनावट असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ट्रकच्या मदतीने अनेकांना चिरडणारा दहशतवादी हा मूळचा उझबेकिस्तानचा असून त्याचे वय २९ वर्षे आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या दहशतवाद्याचे नाव सेफुल्लो सायपोव्ह असे आहे. या दहशतवाद्याने ट्रकबाहेर उडी मारुन अल्लाहू अकबर म्हटल्याची माहितीही पोलिसांनी दिली.

आता बस झालं!- डोनाल्ड ट्रम्प
या हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तीव्र शब्दात हल्ल्याचा निषेध केला आहे. “आता बस झालं, आखाती देश आणि इतरत्र आयसिसला नामोहरम केल्यानंतर त्यांना अमेरिकेत घुसू देणार नाही,” असं ट्वीट डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे.“या हल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबाच्या दु:खात मी सहभागी आहे. देव आणि तुमचा देश तुमच्यासोबत आहे,” असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

3 Comments

Click here to post a comment