SATARA | भाजप आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या गाडीचा आज पहाटे भीषण अपघात झाला. साताऱ्यातील फलटण तालुक्यातील मलटण गावच्या हद्दीतील तब्बल ५० फुट खोल दरीत गाडी कोसळल्याने हा अपघात झाला आहे. गाडीत आमदार गोरे यांच्या सह चौघेजण प्रवास करत होते. या अपघातात चौघांना गंभीर दुखापत झाली असून, तात्काळ पोलीस मदत मिळाल्याने आमदार जयकुमार गोरे यांच्या सह त्यांचे अंग रक्षक, स्वीय सहाय्यक आणि चालक या चौघांना ही उपचारासाठी पुण्यात हलवण्यात आले आहे.
हा अपघात कसा झाला याचा तपास सातारा पोलीस करत असून पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. आ.जयकुमार गोरे हे फलटणहुन माणच्या दिशेने जात असताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- Sam Curran | पंजाब किंग्जमध्ये परतल्यानंतर सॅम करनने केलं मोठं वक्तव्य, म्हणाला…
- Maharashtra Weather Update | राज्यात पुन्हा थंडीचा कहर, तापमानात झाली चौथ्यांदा घसरण
- Jayant Patil | मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री साप चावल्याप्रमाणे गप्प बसले ; जयंत पाटील यांची टीका
- Nitin Gadkari | भारताचे इन्फ्रास्ट्रक्चर गरीब माणसाच्या पैशातून उभं करायचं – नितीन गडकरी
- Winter Session 2022 | SIT मार्फत उद्धव ठाकरे यांची देखील चौकशी करा – रवी राणा