मद्यधुंद कारचालकाने रिक्षाचालकासह दुचाकीस्वाराला उडवले; औरंगाबादेत रात्री भीषण अपघात

औरंगाबाद : मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने जात असलेल्या कारचालकाने एका रिक्षासह दुचाकीस्वाराला उडवल्याची घटना मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. ज्योतीनगरजवळील विवेकानंद चौकात हा अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर तर रिक्षाचालक किरकाोळ जखमी झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कार प्रशांत दाभाडे नावाच्या व्यक्तीच्या नावावर आहे. हे दाभाडे उपसंचालक भूमी अभिलेख कार्यालयात कामाला असल्याचे कारमधील कागदपत्रांवरून समोर आले आहे. कार स्वतः दाभाडे चालवत होते की आणखी कुणी चालवत होते, हे मात्र रात्री उशिरापर्यंत कळू शकले नाही.

दरम्यान, मध्यधुंद कारचालक जुन्या राकाज क्लबकडून आतील रस्त्याने सुसाट वेगात येत होता. त्याने आधी ज्योतीनगर चौकाकडे जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला उडवले. त्यानंतर दर्गा चौकाकडून रोपळेकर हॉस्पिटलकडे जाणाऱ्या दुचाकीला आणि अन्य एका रिक्षाला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार दोन्ही वाहनांना धडकून गंभीर जखमी झाला. रिक्षाचालक सतीश गंगावणे हेदेखील गंभीर जखमी झाले.

दरम्यान, स्थानिकांनी या अपघाताचा माहिती पोलिसांना दिली. तसचे जखमी अवस्थेतील दोघांना उरचारासाठी रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थली दाखल झाले. तोपर्यंत कारचालक मद्यधुंद अवस्थेत गाडीतच पडून होता. त्यानंतर पोलिसांनी त्यालाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

महत्त्वाच्या बातम्या