‘तेरी मेरी यारी,…’ ; अंकुश चौधरीने अनोख्या अंदाजात केले मास्क घालण्याचे आवाहन

अंकुश चौधरी

मुंबई : देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतान देखील अनेक महाभाग कोरोना नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. या वाढत्या महामारीला थांबवण्याकरिता राज्य शासनाने कडक नियम लागू केली असली तरी नागरिक मात्र या निर्बंधांना जुमानताना दिसत नाही आहेत. नागरिक शासनाच्या कोणत्याच नियमच पालन करताना दिसत नाहीत. वारंवार शासनाकडून मास्क वापरण्याचे सांगण्यात येत असले तरी देखील नागरिक याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.

परिस्थिती बिकट बनत चालली असल्यामुळे प्रशासनानं नागरिकांनी नियमांचं पालन करावं यासाठी कठोर कारवाई सुरू केली आहे. विशेषतः कोरोनाच्या काळात मास्क न घालणाऱ्या आणि सोशल डिस्टन्सिंगसारख्या नियमांचं पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

दरम्यान, अभिनेता अंकुश चौधरीने अनोख्या अंदाजात आपल्या चाहत्याना आवाहन केले आहे. अभिनेता अंकुश चौधरीने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत. त्यात लिहिलंय की ‘तेरी मेरी यारी, अगोदर मास्क घालू मग करू दुनियादारी..मी जबाबदार’. या पोस्ट मध्ये अंकुश चौधरीने त्याचा सुपरहिट चित्रपट दुनियादारीमधील डायलॉग वापरला आहेत. अंकुशच्या या पोस्टवर भरभरून कमेंट्स येत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या