संविधान जाळणाऱ्यांंचा निषेध करत दौंड येथे ठीय्या आंदोलन

दौंड, सचिन आव्हाड : दिल्ली येथे संविधान जाळले या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत .आज दौंड शहरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भारीप बहुजन महासंघ , दौंड शहरातील सर्व राजकिय पक्ष दौंड शहर यांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी संविधान जाळणाऱ्यांंना अटक करण्याची मागणी करण्यात आली.

जंतरमंतर मैदानावर देशाच्या संविधान काही समाज कंटकांनी जाळले होते, त्या निषेधार्थ दौंड शहरामध्ये सर्व पक्षीय ठिय्या आंदोलन करण्यात आले. संविधान जाळणाऱ्यांंना व आंबेडकर मुर्दाबाद अशा घोषणा देणार्यांना कडक शासन करण्यात यावे. या स्वरुपाचे लेखी निवेदन दौंड पोलीस निरीक्षक महाडीक यांना देन्यात आले.

भारताला ‘संविधान’ कॉंग्रेस आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिले- राहुल गांधी

You might also like
Comments
Loading...