विराट आणि बीसीसीआयमध्ये तणाव; माजी खेळाडूचा खुलासा

virat

नवी दिल्ली : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने टी20 फॉरमॅटचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विराटने ही माहीती दिली. त्याच्या या निर्णयावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. चाहत्यांसोबत माजी खेळाडूंनीही  यावर भाष्य केले आहे. काहींना त्याचा हा निर्णय बरोबर वाटला. तर काहींना त्यावर बीसीसीआयचा प्रभाव जाणवला. यावरच माजी खेळाडूने प्रतिक्रिया देत विराट आणि बीसीसीआयमध्ये ताणलेल्या संबंधांविषयी सांगितले आहे.

भारताचे माजी खेळाडू आणि निवड समितीचे माजी अध्यक्ष संदीप पाटील यांनी विराटच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना याबाबत भाष्य केले आहे. विराटच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे. नेतृत्व आणि फलंदाजी एकसोबत हाताळणे कठीण असते. कर्णधारपदाचं मानसिक ओझं ही जास्त असत त्यामुळे फलंदाजीवर लक्ष केंद्रित होत नाही. विराटने घेतलेल्या निर्णयचा त्याच्या बॅटिंग वर १००% चांगला परिणाम होईल. असे त्यांनी सांगितले आहे. यावेळी त्यांनी विराट आणि बीसीसीआयमध्ये सगळे काही आलबेल नसल्याचेही सांगितले. विराट आणि बीसीसीआयमध्ये संवादाची कमतरता जाणवत आहे. विराट नेतृत्व सोडणार हे वृत्त जेव्हा बाहेर आले तेव्हा बोर्डने तो फेटाळून लावला होता. नेतृत्व सोडण्याचा निर्णय विराटचा आहे आणि बीसीसीआयने तो मान्य करायला हवा. असे मत पाटील यांनी मांडले आहे.

विराट आणि बीसीसीसीआयमध्ये वाद झाल्याचे काही मोठे कारण समोर आले आहेत. ज्यात विराटने रोहितला उपकर्णधारपदावरून हटवून कोणीतरी नवा युवा उपकर्णधार असावा अशी मागणी बीसीसीआयकडे केली होती. मात्र बीसीसीआयने विराटची मागणी नाकारली होती. आता विराट टी ट्वेंटी कर्णधारपदावरून पायउतार झाल्यामुळे या सगळ्या गोष्टीनी सोशल मीडियावर जोर धरला आहे. बीसीसीआयने खरेच विराटवर दबाव आणला का असेही प्रश्न चाहते उपस्थित करत आहेत. टी ट्वेंटी नंतर आता विराट कोहलीचे एकदिवसीय सामन्याचे कर्णधारपद ही धोक्यात दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या