पोलीस मुख्यालयापुढील कबुतर पुतळा हटवल्याने शहरात तणाव

सातारा  : पोलीस मुख्यालयासमोर गेली 18 वर्ष शांततेचे प्रतिक असणारा शांतीदूत पुतळा सातारा पोलिसांनी रात्री 12.30 वाजता हलवला. हा पुतळा साता-याबाहेर घेऊन जाणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर नागरिकांनी पुतळ्यासमोर उत्स्फूर्त आंदोलनाला सुरुवात केली होतीशांतिदूत शहरातून बाहेर नेण्याला नागरिकांचा विरोध पाहून पोलिसांनी शांतीदूत जिल्ह्याबाहेर न जाता साता-यातच राहणार असल्याचे स्पष्ट केले. तूर्तास हा पुतळा पोलिस मुख्यालयाच्या पाठीमागे ठेवण्यात आला असून लवकरच तो सातारा पोलीस कवायत मैदानावर स्थानापन्न करण्यात येणार आहे.

दरम्यान सातारा पोलिसांच्या या कृतीबद्दल साता-यात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा पुतळा आहे त्या जागच ठेवावा या मागणीसाठी आज शुक्रवारी सकाळी मराठी क्रांती मोर्चा, शिवसेन, आरपीआय , मनसे , जिजाऊ प्रतिष्ठान या विवध पक्ष व संघटनांच्या वतीने जिल्हाधिकरी श्‍वेता सिंघल यांना निवेदन देण्यात आले. आज सकाळपासूनहा पुतळा कोल्हापूर कडे न नेता जिल्हा पोलीस मुख्यालयाच्यामागील मेैदानावर ठेवण्यात आला आहे.

सातारा जिल्ह्यातील पोलीस मुख्यालयासमोर तत्कालीन पोलीस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी दि 14 फेब्रुवारी 2000 साली म्हणजे अठरा वर्षीपूर्वी मोठ्या उत्साहात शांतिदुताचे प्रतीक म्हणून सोनेरी रंगाचे कबुतर बसविण्यात आले होते. त्यासाठी लाख मोलाचा निधी खर्च झाला होता. आता पुन्हा पोलीस कवायत मैदानावर या शांतिदुताचे पुनर्वसन करण्यात येणार आहे अशी जुजबी माहिती देण्यात आली आहे

You might also like
Comments
Loading...