बनावट ओळख पत्र बनवून निवडणूक आयोगाची फसवणूक करणारा दहा वर्षांनतर अटकेत

औरंगाबाद : गुन्हे शाखेमार्फत सध्या फरार आरोपींचा शोध घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. याच दरम्यान २००९ साली बनावट ओळखपत्र बनवून निवडणूक आयोगाची फसवणूक करून, दहा वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. राजू सरदार शहा वय ४५, रा. मातोश्री नगर, रांजणगाव असे आरोपीचे नाव आहे.

पोलीसंनी दिलेल्या माहिती नुसार, निवडणूक आयोगाचे ओळख पत्र बनविण्यासाठी, रहिवासी प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, निवडणूक आयोगाचा फॉर्म क्रमांक सहा अशी सर्व बनावट कागाद पत्र शहा याने निवडणूक आयोगाच्या कार्यालयात २००९ साली जमा केली होती. आयोगाच्या पडताळणीत सर्व कागद बनावट असल्याने तत्कालीन अधिकाऱ्यांनी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

गुन्हे शाखेच्या पथकाला राजू शहा हा रांजणगावात असल्याची माहिती मिळाली. माहितीची खात्री करून सापळा लावण्यात आला. राजू शहा रांजणगावात येताच पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर तपास कामी त्याला सिटी चौक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. हि कारवाई सहाय्यक फौजदार विठल जवखेडे यांच्या पथकाने केली.

महत्वाच्या बातम्या 

IMP