पाच वर्षांत रेल्वेमध्ये दहा लाख अतिरिक्त रोजगाराची संधी – पियुष गोयल

रेल्वेला नवी दिशा देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार -गोयल

मुंबई : येत्या पाच वर्षांत रेल्वेमध्ये दहा लाख अतिरिक्त रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचे आश्वासन रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिली. यासाठी रेल्वेने १५० अब्ज डॉलर्स गुंतवणुकीची योजना आखल्याची माहितीही गोयल यांनी दिली आहे. मुंबईत आयोजित कार्यक्रमात गोयल बोलत होते.

रेल्वेला नवी दिशा देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. रेल्वे मंत्रालय आधी दहा वर्षांतून एकदा रेल्वे मार्गांच्या विद्युतीकरणाचे काम करत होती. मात्र, आता चार वर्षांतून एकदा रेल्वे मार्गांच्या विद्युतीकरणाचे काम करत आहे. विद्युतीकरणामुळे दरवर्षी १० हजार कोटी रुपयांच्या इंधनाची बचत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

You might also like
Comments
Loading...