संपूर्ण नाशिक जिल्ह्यात दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन; पालकमंत्री छगन भुजबळ यांची माहिती

chhagan bhujbal

नाशिक : ‘नाशिक जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या अंशत: लॉकडाऊनमुळे काही प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होत आहे. परंतू गेल्या तीन चार दिवसांपासून बाधितांची संख्या एका विशिष्ट मर्यादेला स्थिर झाली आहे. ही बांधितांची संख्या पुर्णत: कमी करण्यासाठी कठोर निर्णय घेवून 12 मे 2021 रोजी दुपारी 12:00 पासून 23 मे 2021 पर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या कडक लॉकडाऊनच्या काळात जनतेच्या पूर्ण सहकार्याने आपण कोरोना विरूद्धची ही लढाई नक्की जिंकूअसा मला ठाम विश्वास आहे,’ असं भाष्य नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे.

पुढे ते म्हणाले, रुग्णसंख्या कमी करण्यासाठी जिल्ह्यात 12 मेपासून 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात येत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेतील कोरोना बाधितांच्या संख्यापेक्षा आताच्या परिस्थितीत बाधितांची संख्येत वाढ झाली आहे. यावर उपाय म्हणून राज्यात व जिल्ह्यात अंशत: कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या काळात अनेक कारखानदार, बांधकाम व्यावसायिक यांनी तेथे काम करणाऱ्या कामगारांची तेथेच व्यवस्था करून त्यांच्या लसीकरणाची देखील सोय करण्यात यावी, असे कारखान्यांचे मालक व बांधकाम व्यावसायिक यांना सूचित केले आहे.

त्याचप्रमाणे या लॉकडाऊनच्या कालावधीत शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाचे नुकसान होऊ नये आणि बाजारपेठांमध्ये गर्दी न करता त्यासाठी पर्यायी व्यवस्था करता येईल याबाबत बाजार समित्यांनी नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासोबतच, रुग्णालय, मेडिकल हे सुरु राहणार आहेत. तर, फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठीच पेट्रोल-डिझेल विक्री सुरु राहणार असून किराणा मालासह अन्य दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. केवळ होम डिलिव्हरी देण्यास सकाळी ७ ते दुपारी १२ पर्यंत सूट देण्यात आली आहे.

अशंत: कडक निर्बंध लागू करण्यात आलेल्या काळात जिल्हा प्रशासनामार्फत आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी अनेक सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. याअंतर्गत ऑक्सिजन पुरवठा, बेडस् उपलब्धता, औषधसाठा, मनुष्यबळ यासारख्या अडचणींवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत उपाययोजना करण्यात येत असून जिल्ह्यात सुरळीत ऑक्सिजन पुरवठ्याच्या अनुषंगाने 29 ठीकाणी ऑक्सिजन निर्मीती केंद्र येत्या महिनाभरात सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती देखील छगन भुजबळ यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP