‘भाजपाच्या थयथयाटामुळे नाही, तर डॉक्टरांच्या ‘टास्क फोर्स’ने मान्यता दिल्यावर मंदिरे उघडली’

‘भाजपाच्या थयथयाटामुळे नाही, तर डॉक्टरांच्या ‘टास्क फोर्स’ने मान्यता दिल्यावर मंदिरे उघडली’

sanjay raut

मुंबई: नवरात्रीच्या उत्सवापासून राज्यातील सर्व मंदिरे उघडली गेली. आता सर्व शाळा आणि महाविद्यालयेही उघडण्यात आली आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. त्यातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून भाजपवर ताशेरे ओढले आहेत.

22 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे, नाटय़गृहे सुरू होत आहेत. मॉल्स आधीच उघडले आहेत. देवळेही बंधमुक्त आहेत. काही दिवसांपूर्वी राज्यातील विरोधी पक्षाने निर्बंधांच्या बाबतीत अकारण थयथयाट केला होता. मंदिरे, सण, उत्सवांवर निर्बंध घालणारे सरकार हिंदूविरोधी असल्याचे ते बोंबलत होते. या मंडळींनी रस्त्यावर येऊन घंटाही बडवल्या होत्या. त्यांनी घंटा बडवल्या म्हणून सरकारने मंदिरे उघडली नाहीत, तर डॉक्टरांच्या ‘टास्क फोर्स’ने मान्यता दिल्यावरच मंदिरांचे दरवाजे उघडले.असल्याचे म्हणत संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे.

दरम्यान महाराष्ट्रात जम्बो कोविड सेंटर्स, प्राणवायूचा पुरवठा, औषधांचा पुरवठा, कडक निर्बंध, सोशल डिस्टन्सिंग याबाबत ठाकरे सरकार जागरूक राहिल्यानेच कोरोना काही प्रमाणात आटोक्यात येऊ शकला व आज दिवाळीच्या तोंडावर लॉकडाऊनचे टाळे उघडता आले. निर्बंध उठलेच आहेत. तेव्हा एकमेकांच्या सहकार्याने, नियम-कायद्यांचे पालन करून मुंबई-महाराष्ट्रास कामधंद्यास लागू द्या. जगा आणि जगू द्या. उगाच आडवे येऊन लोकांचा छळ करू नका. असे आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून केले आहे.

महत्वाच्या बातम्या