येत्या ४८ तासात राज्यात उष्णतेच्या लाटांची शक्यता

टीम महाराष्ट्र देशा : मुंबई, पुणे, नाशिककर पुढील दोन दिवस वाढत्या उष्म्यामुळे त्रस्त होण्याची शक्यता आहे. कारण येत्या 48 तासात मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये उष्णतेच्या लाटा बसण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे.

एकीकडे राज्यात तापमान वाढण्याची शक्यता असताना दुसरीकडे महाबळेश्वरच्या तापमानात कमालीची घट झाली आहे.

उष्णतेच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी लोकांना काळजी घ्यावी लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमान स्थिर आहे. पण येत्या 48 तासात पुर्वेकडून उष्ण वारे वाहणार असल्याने तापमानात वाढ होणार आहे.