स्टॅम्प घोटाळ्यातील तेलगीसह इतर आरोपींंची निर्दोष सुटका

नाशिक: देशातील बहुचर्चित तेलगी घोटाळा म्हणून ओळखल्या गेलेल्या स्टॅम्प घोटाळ्यातील सर्व ७ आरोपींंची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.आज नाशिक जिल्हा न्यायालयात न्यायधीश पी. आर. देशमुख यांच्या सुनावणीखाली हा निर्णय देण्यात आला.

बनावट स्टॅॅम्प घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार अब्दुल करीम तेलगी तुरुंगात मृत्यू झाला आहे.तर भक्कम पुराव्याअभावी बाकी ७ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.२५ ऑगस्ट २००४ला आरोप पत्र दाखल करण्यात आलं होतं. हा ३३ हजार कोटींचा मुद्रांक घोटाळा असून रेल्वेनं देशभरात मुद्रांक पाठवले असल्याचा आरोप होता. या खटल्यात रेल्वे सुरक्षा बल अधिकरी आणि कर्मचारी आरोपी होते.

Loading...