‘नवे रुग्ण न आढळल्यास ‘हे’ राज्य ‘७ एप्रिल’पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता’

हैदराबाद : ‘कोरोना साथीमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी त्यांच्याकडील धान्य सरकार विकत घेणार आहे. त्यासाठी ३,२०० कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारने केली आहे,’ अशी माहिती तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रेशखर राव यांनी दिली.

पत्रकार परिषदेत राव म्हणाले, तसेच नवे रुग्ण न आढळल्यास तेलंगणा ७ एप्रिल पर्यंत कोरोनाच्या साथीपासून मुक्त होण्याची शक्यता आहे, अशी घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रेशखर राव यांनी सोमवारी केली.

‘कोरोनातून संपूर्णपणे बऱ्या झालेल्या ११ जणांना सोमवारी घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. विदेशातून तेलंगणामध्ये आलेल्या २५,९३७ लोकांच्या प्रकृतीवर सरकारी यंत्रणेचे बारीक लक्ष आहे. या सर्वांचा क्वारंटाईन कालावधी १४ एप्रिल रोजी संपणार आहे,’ असे ते म्हणाले.

दरम्यान, सोमवारपर्यंत राज्यात नोंदवण्यात आलेल्या या करोनाबाधित रुग्णांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे महाराष्ट्रामध्ये असून मुंबईमध्ये सर्वाधिक म्हणजे ८७ रुग्णांची नोंद झाली आहे, त्या खालोखाल पुणे आणि सांगलीमध्ये २५ तर नागपूरमध्ये १४ करोनाबाधित आढळून आले आहेत.