fbpx

शिवजन्मभूमीत होतीये विद्यार्थ्यांची लूट

टिम महाराष्ट्र देशा – जून्नर तालूक्यातील श्री शिवछत्रपती महाविद्यालयात चक्क खासगी क्लासेस चालवून विद्यार्थ्यांची लूट सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. हे महाविद्यालय शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळाचे असून, यामध्ये खासगी क्लासेस चालवून विद्यार्थ्यांकडून जादा पैसे घेतले जात आहेत.

संस्थेचे अध्यक्ष अॅड संजय काळे यांनी खासगी क्लासेस प्रकरणी पत्रकार परिषदेत असे नमूद केले होते की, महाविद्यालयात कूठल्याच पद्धतीचे खाजगी क्लासेस चालत नाहीत व चालवले जात नाहीत. मात्र, खाजगी क्लासेसच्या नावाखाली विद्यार्थ्यांची पाच हजार रू. घेवून सर्रास लूट चालू असल्याचा आरोप गटशिक्षणाधिकारी के.डी. भुजबळ यांनी केला व संस्था हा गैरप्रकार करत आहे. यावर कारवाई व्हावी असेही माध्यमांसमोर स्पष्ट केल . यावर गटशिक्षणाधिकारी आमच्या कार्यात ख्वाडा घालत आहेत व आमच्यावर खोटे आरोप लावत आहेत. आम्ही त्यांच्यावर गून्हाही दाखल करणार आहोत अस संस्थेचे अध्यक्ष अॅड. संजय काळे यांनी नमूदही केल होतं.

या प्रकरणी थेट विद्यार्थ्यांशी संपर्क साधला असता असे दिसून आले की,विद्यार्थ्यांकडून खासगी क्लासेसच्या नावाखाली पाच हजार रूपये घेण्यात आले आहेत. क्लास देखील अर्धवटच घेण्यात आल्याची माहिती विद्याथर्यांनी दिली. याप्रकरणी विद्यार्थ्यांचे पैसै परत न केल्यास भारतीय विद्यार्थी संघटनेच्या वतीनं संस्थेला देण्यात आला आहे.