आणखी एका ठाकरेंची राजकारणात एन्ट्री ?

saamana tejas

मुंबई: शिवसेनेत आणखी एक नाव चर्चेत आलं आहे. शिवसेनेत आदित्य ठाकरे नंतर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत नवीन नाव समोर आलं आहे. उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि आणि आदित्य ठाकरे यांचे बंधू तेजस ठाकरे राजकारणात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असेलेल्या सामनातून तेजस ठाकरे राजकीय भूमिकेतून समोर आले आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेने महाराष्ट्र निवनिर्माण सेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला मात देवून १० पैकी १० जागा जिंकल्या. या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांची महत्वाची भूमिका होती. यावेळी आदित्य ठाकरे यांनी विधानसभेवर सुद्धा शिवसेना जास्तीत जास्त जागा जिंकेल असे म्हटले होते.

दरम्यान, विजयाचा आनंद म्हणून सामनातून जाहिरातीमध्ये तेजस ठाकरे यांचा फोटो छापण्यात आला आहे. त्यामुळे लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेजस ठाकरे यांच्याकडे युवासेनेची जबादारी येणार असल्याची चर्चा वर्तविण्यात येत आहे.