मोदींची चामडी सोलून काढू- तेजप्रताप यादव

tej pratap yadav

टीम महाराष्ट्र देशा – लालूप्रसाद यांच्या हत्येचा कट रचला जात असून त्यांच्या सुरक्षेत कपात करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं जाईल आणि मोदी यांची चामडी सोलून काढू, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे.सुशीलकुमार मोदी यांच्या नंतर आता तेजप्रताप यादव यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच धमकी दिली आहे.

नुकतीच लालूप्रसाद यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. त्याबाबत तेजप्रताप यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारले असता त्यांनी पंतप्रधान मोदींविषयी वादग्रस्त विधान केले. ‘दररोज विविध कार्यक्रमांना उपस्थित राहावे लागते. लालूप्रसादही अनेक कार्यक्रमांना हजेरी लावतात. अशावेळी त्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. त्यांच्या हत्येचा कट रचला जात आहे. त्याला सडेतोड उत्तर देऊ, तसेच मोदींची चामडी सोलून काढू,’ अशी धमकी त्यांनी दिली. याबाबतचा व्हिडिओ ‘एएनआय’ने ट्विट केला आहे.