fbpx

शिवसेना इफेक्ट : कृषी खाते कामाला लागले, पीक विम्यासाठी तहसीलदारांची समिती

udhav thackeray rally at kankavli

टीम महाराष्ट्र देशा- पीक विमा कंपन्यांची मनमानी खपवून घेणार नाही. येत्या बुधवारी मुंबईतील विमा कंपनी कार्यालयावर जोरदार धडक देऊ, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देताच राज्याचे कृषिखाते खडबडून जागे झाले आहे. पीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांच्या तक्रारी स्थानिक पातळीवरच सोडविण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरावर तक्रार निवारण समिती नेमण्याचा निर्णय सरकारने घेतला असून यात दोन शेतकरी प्रतिनिधींचा समावेश असणार आहे.

केंद्र तसेच राज्य सरकारकडून दिला जाणारा पीक विम्याचा हिस्सा कंपन्यांना दिला गेला आहे. मात्र त्यानंतरही अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने जिल्ह्याजिल्ह्यात मदत केंद्रे सुरू केली. या मदत केंद्रांवर पीक विमा न मिळालेल्या लाखो शेतकऱ्यांचे अर्ज आले आहेत. त्यांना न्याय मिळावा यासाठी शिवसेनेने मोर्चाचा इशारा दिला असतानच राज्य सरकारनेदेखील प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पाऊल उचलले आहे.