Tecno Mobile Launch | टीम महाराष्ट्र देशा: मोबाईल उत्पादक कंपनी टेक्नो (Tecno) नेहमी नवीन फीचर्ससह आपले मोबाईल (Mobile) बाजारात लाँच करत असते. टेक्नोने नुकताच भारतीय बाजारपेठेमध्ये Tecno Pova 4 हा स्मार्टफोन लाँच केला आहे. टेक्नोचा लाँच झालेला हा नवीन मोबाईल MediaTek Helio G99 प्रोसेसर, 90Hz रिफ्रेश रेट आणि 50MP कॅमेरासह उपलब्ध आहे.
Tecno Pova 4 फीचर्स
Tecno Pova 4 या मोबाईलमध्ये 6.82 इंच HD + LCD डिस्प्ले उपलब्ध आहे. ज्यामध्ये 1640 × 720 पिक्सेल रिझोल्यूशन, 90Hz रीफ्रेश रेट, 180Hz टच सॅम्पलिंग रेट आणि मध्यवर्ती पंच-होल नॉच देण्यात आलेला आहे. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G99 प्रोसेसर देण्यात आलेला आहे. या फोनच्या स्टोरेजबद्दल बोलायचे झाले, तर या मध्ये 8 जीबी रॅम आणि 228 जीबी ऑनबोर्ड स्टोरेज उपलब्ध आहे. त्याचबरोबर या फोनमध्ये 5 जीबी व्हर्च्युअल रॅम फीचर देखील देण्यात आलेले आहे.
Tecno Pova 4 या मोबाईलच्या कॅमेराबद्दल बोलायचे झाले, तर यामध्ये ड्युअल रियल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. ज्यामध्ये AI लेन्स आणि LED फ्लॅशसह 50MP प्रायमरी शूटर कॅमेरा देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी या मोबाईलमध्ये 8MP कॅमेरा देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर टेक्नोचा हा नवीन स्मार्टफोन बाजारामध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर, मायक्रोएसडी कार्ड स्लॉट, डीटीएस ऑडिओ, IPX2 रेटिंग, ड्युअल-सिम, 4जी, वायफाय, ब्लूटूथ 5.0, एनएफसी, जीपीएस आणि ग्लोनास आणि स्टिरीओ स्पीकर सेटअप इत्यादी वैशिष्ट्यसह उपलब्ध आहे.
Tecno Pova 4 या स्मार्टफोनच्या 8GB+128GB व्हेरियंटची किंमत 11,999 रुपये आहे. 13 डिसेंबर पासून हा स्मार्टफोन ॲमेझॉन इंडिया आणि जिओ मार्टवर खरेदीसाठी उपलब्ध असेल. हा फोन बाजारामध्ये चार रंगाच्या पर्यायासह सादर करण्यात आलेला आहे. यूरेनोलिथ ग्रे, मैग्मा, ऑरेंज आणि क्रायोलाइट ब्लू या रंगांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या
- Health Tips | सकाळी रिकाम्या पोटी पिस्ता खाल्याने मिळतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे
- KGF | KGF मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या ‘या’ अभिनेत्याने घेतला अखेरचा श्वास
- Yo Yo Honey Singh | घटस्फोटानंतर हनी सिंग पडला पुन्हा प्रेमात, दिसला गर्लफ्रेंडसोबत फिरताना
- Immunity Booster | हिवाळ्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवायची असेल, तर आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश
- Balasaheb Thorat | “…तेव्हा आपले मुख्यमंत्री गुवाहाटीला पर्यटन करत होते”; सीमावादावरून बाळासाहेब थोरात यांची सडकून टीका