शाओमीच्या धमाकेदार ऑफर; फक्त १ रुपयात शाओमीचे प्रोडक्ट

शाओमी कंपनीने आपल्या mi.com या अधिकृत वेबसाईटवर दिवाळीनिमित्त धमाकेदार सेल सुरु केला आहे. हा सेल 29 सप्टेंबरपर्यंत सुरु असणार आहे. शाओमीच्या सेलमध्ये नेमक्या ऑफर्स काय? त्याबद्दल जाणून घेऊयात…

1) सेलमध्ये दररोज सकाळी 11 वाजता आणि संध्याकाळी 5 वाजता 1 रुपयांचा फ्लॅश सेल इव्हेंट होणार आहे. ज्यामध्ये यूजर्स फक्त 1 रुपयात शाओमीचे प्रोडक्ट खरेदी करु शकतात.

2) या सेलमध्ये शाओमी रेडमी नोट 4 (4जीबी + 64 जीबी) हा स्मार्टफोन 10,999 रुपयात उपलब्ध आहे. याची किंमत 12,999 रुपये आहे. तर mi Max 2च्या किंमतीतही दोन हजारांची सूट देण्यात आली आहे.

3) mi राऊटवर 3C हा या सेलमध्ये 899 रुपयांना उपलब्ध आहे. याची किंमत 1,199 रुपये होती.

4) इन-इअर हेडफोन प्रो एचडी हे 599 रुपयात खरेदी करता येणार आहेत.

5) शाओमीचा एअर प्युरीफायर -2 वर देखील घसघशीत सूट देण्यात आली आहे. 9,999 रुपये किंमतीचा हा प्युरीफायर 8,499 रुपयांना खरेदी करता येईल. तर एअर प्युरीफायर बंडल 9,998 रुपयात खरेदी करता येईल. ज्याची किंमत 12,498 रुपये आहे.

याशिवाय कंपनीने इतरही गॅझेट्सवर भरघोस सूट दिली आहे.

You might also like
Comments
Loading...