मध्य रेल्वेच्या 35 तर पश्चिम रेल्वेच्या 7 गाड्यांमध्ये तांत्रिक बिघाड

Technical snag stops Mumbai local railway

मुंबई : मुंबईत मंगळवारी झालेल्या पावसामुळे मध्य रेल्वेच्या 35 आणि पश्चिम रेल्वेच्या 7 गाड्या बिघडल्या आहेत. त्यामुळे लोकल रेल्वेची संख्या कमी होऊन रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. तसेच सर्व मेल-एक्स्प्रेस गाड्या निर्धारीत वेळेपेक्षा उशिरा धावत आहेत. आसनगावजवळ मंगळवारी नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसला झालेल्या अपघातानंतर लोकलसेवा विस्कळीत झाली होती.

मध्य रेल्वेच्या लोकल अर्धा तास उशिराने धावत असून टिटवाळा-कसारा मार्ग अजूनही ठप्प आहे. त्यामुळे अनेक एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तांत्रिक बिघाड झालेल्या 35 लोकल रुळावर यायला आणखी दोन दिवस लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.