नेटपरीक्षेचा अर्ज भरतांना तांत्रिक अडचणी ; विद्यार्थी त्रस्त

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेचे (नेट) अर्ज ११ तारखेला सी बी एस सी च्या वेबसाईटवर बोर्डाकडून उपलब्ध करण्यात आले. मात्र तांत्रिक अडचणी मुळे विद्यार्थाना अर्ज भरण्यास मानसिक त्रास होत आहे.
राष्ट्रीय पात्रता परीक्षेचे अर्ज भरण्यास विद्यार्थांनी गर्दी केली आहे. ११ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर अर्ज भरण्यासाठी कालावधी देण्यात आला आहे. अर्ज भारतानां विद्यार्थांना तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. १२ तास प्रयत्न करूनही अर्ज भरता येत नसल्याने. विद्यार्थांनी सी बी एस सी बोर्ड वर रोष व्यक्त केला आहे. सदर वेब साईटवरील तक्रार क्रमांकावर फोन केल्यास कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीचे उत्तरे देण्यात येत आहेत. तसेच आज १३ दिवसानंतर काही विद्यार्थांना अर्ज भरता आले आहेत. त्यामुळे विद्यार्थांनी अर्ज भरण्याचा कालावधी वाढवण्याची मागणी केली आहे.

मी ११ तारखेपासून ‘नेट’ परीक्षेचा ऑनलाईन अर्ज भरण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु प्रत्येक वेळी ‘स्टेट’ या पहिल्याच ऑप्शन वर क्लिक केल की ‘साईट टेम्पररी आऊट ऑफ सर्व्हिस’ अशी सूचना दाखवत आहे. त्यामुळे अर्ज भरण्यास त्रास होत आहे. अर्ज येऊन १३ दिवस झाले आहे. तरी अर्ज भरता येत नाही आहे. अर्ज भरण्यास विद्यार्थांची संख्या जास्त असल्यामुळे बोर्डाने कालावधी वाढवावा.
प्रशांत शिंदे, विद्यार्थी