नितीन गडकरी प्रवास करीत असलेल्या इंडिगोच्या विमानात तांत्रीक बिघाड

टीम महाराष्ट्र देशा- दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानं त्याचं उड्डाण रद्द करण्यात आलं. याच विमानातून काही प्रवाशांसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रवास करणार होते. मात्र ही बाब योग्य वेळी वैमानिकाच्या लक्षात आली. त्यामुळे त्यानं विमानाचं उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेतला.

सुदैवाने कोणतीही जिवीतहानी नाही. मिळालेल्या माहितीनुसार, विमानाची ही फेरी रद्द करण्यात आली आहे. विमानातील प्रवाशांसोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरीदेखील प्रवास करत हाते. पण तांत्रीक बिघाड झाल्याने गडकरी यांना दिल्ली दौरा रद्द करावा लागाला. दरम्यान, यानंतर विमान धावपट्टीवरुन टॅक्सीवेकडे नेण्यात आलं.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इंडिगोचे ६ ई ६३६ हे विमान आज सकाळी नागपूरहून दिल्लीसाठी रवाना होणार होते. नितीन गडकरी देखील या विमानात उपस्थित होते. विमान रनवेवर धावायला लागल्यावर काही क्षणातच पायलटला विमानात गंभीर तांत्रिक बिघाड झाल्याचं लक्षात आलं. त्याने लगेच विमान रोखले आणि शेडच्या दिशेने वळवले. विमानातील सर्व प्रवासी सुखरूप असून नागपूर विमानतळावरील अभियंते विमानाची चाचपणी करत आहेत.

महत्वाच्या बातम्या