‘नारायण राणेंना’ चालू सभेत शिक्षकाने खडसावल

नारायण राणे

सिंधुदुर्ग : प्राथमिक शिक्षक समितीच्या १६व्या अधिवेशनात बोलतांना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची चांगलिच फजिती झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोसमध्ये झालेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेच्या १६ व्या अधिवेशनाची आज सांगता झाली. या अधिवेशनाला पूर्ण राज्यातून शिक्षक उपस्थित होते.

या अधिवेशनाच्या समारोप सोहळ्यात माजी मुख्यमंत्री नारायण राणेही उपस्थित होते. त्यावेळी शिक्षकांना संबोधित करताना राणे यांची जीभ घसरली. राणे म्हणाले, “शिक्षकांनी आपल्या जबाबदाऱ्या ओळखून काम केले पाहिजे” त्यामुळे एका शिक्षकाने भाषण सुरु असतांनाच मध्ये उभे राहत ‘चांगलं बोला’अशी ओरड केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यावर राणे यांनी त्या शिक्षकालाही खडे बोल सुनावले.