fbpx

महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मंत्रालयावर २२ फेब्रुवारीला मोर्चा

MANTRALAY mumbai maharashtra

प्रदीर्घ कालावधीपासून प्रलंबित असलेल्या अकरा मागण्यांसाठी सरकारी, निमसरकारी कर्मचारी व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने २२ फेब्रुवारीला मुंबईत मंत्रालयालवर मोर्चा निघणार आहे. या मोर्चात महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारीही सहभागी होणार आहेत. हा मोर्चा भायखळा येथील जिजामाता उद्यान (राणीबाग) पासून २२ फेब्रुवारीला दुपारी दोन वाजता निघणार आहे. शहर व जिल्ह्यातील प्रत्येकी महाविद्यालयातील किमान दोन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन कॉलेज कर्मचारी युनियनचे अध्यक्ष राजेंद्र गोटे, कार्यध्यक्ष राजेंद्र गिड्डे, उपाध्यक्ष दत्ता भोसले व सरचिटणीस अजित संगवे यांनी केले आहे.

सातवा वेतन आयोगाच्या शिफारशी त्वरीत लागू करा, अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करा, केंद्राप्रमाणे महागाई भत्ता थकबाकीसह रोखीने द्यावा, पाच दिवसाचा आठवडा विनाविलंब सुरू करा, सेवानिवृत्तीचे वय विनाअट ६० वर्षे करा, महिला कर्मचाऱ्यांना दोन वर्षाची बाल संगोपन रजा मंजूर करा, ३० टक्के नोकरकपातीचा निर्णय रद्द करून सर्व रिक्त पदे त्वरित भरा, अनुकंपा भरती विनाअट लगेच सुरू करा, निवृत्त चतुर्थश्रेणी कर्मचऱ्यांच्या एका वारसाला पूर्वीप्रमाणे महाविद्यालयीन सेवेत नियुक्त करा, शिक्षण क्षेत्रातील विनाअनुदानित धोरण रद्द करा, या ११ मागण्या प्रलंबित आहेत. यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे