मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या बेधडक आणि दमदार भूमिकामुळे प्रसिद्ध आहे. तिच्या अभिनयाच्या जोरावर तिने स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. तीचा चाहता वर्ग देखील मोठा असून तिच्या नवीन चित्रपट पाहण्यासाठी अनेकजण आतुर असतात. अशातच आता तापसीचा आणि विक्रांत मेस्सीचा ‘हसीन दिलरुबा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या चित्रपटाचा टीझर देखील रिलीज झालाय. हा टीझर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
अभिनेत्री तापसीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा टीझर रिलीज केला. हा टीझर शेअर करत लिहिलं की, ‘प्यार के तीन रंग, खून के छींटों के संग’ या टीझरमध्ये अभिनेता विक्रांत मेस्सी याच्यासोबत तिचे बोल्ड सीन दिसून आले. यात एका कटकारस्थाचा अंदाज देखील देण्यात आला. अभिनेता हर्षवर्धन राणे याची खूपच इंटरेस्टिंग भूमिका असणार, याची कल्पना हा टीझर पाहून लक्षात येते.
आनंद एल. राय या सिनेमाची निर्मिती करत आहेत. या सिनेमाचे शूटिंग गेल्यावर्षी जानेवारीत हरिद्वारमध्ये सुरू झाले होते. ‘हसीन दिलरुबा’चे बहुतेक शूटिंग हरिद्वार आणि ऋषिकेशमध्ये केले गेले आहे. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये हा सिनेमा रिलीज होणार होता, मात्र कोरोनाची परिस्थिति पाहता हा चित्रपट रिलीज करण्याची तारीख पुढे ढकलावा लागली होती. तर आता ‘हसीन दिलरुबा’ सिनेमा २ जुलैला रिलीज होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्र कोरोनामुक्तीकडे ; दिवसभरात २१ हजार ८१ रुग्ण झाले कोरोनामुक्त
- ‘ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी सर्व ओबीसी संघटनांना एकत्र घेऊन आंदोलने करणार’
- ‘हातात कागद न घेता ठाकरेंना मराठा आरक्षणाबाबत एकही मुद्दा सांगता येणार नाही’
- मोदी सरकार म्हणजे हातावर पोट असणाऱ्या गरिबांची काळजी वाहणारे सरकार – रामदास आठवले
- विषय हार्ड : निलेश लंकेच्या कोविड सेंटरमध्ये चक्क ‘शुभमंगल सावधान!’