‘प्रत्येक भारतीय महिलेला महाराष्ट्रानं दिलेली देणगी’ डॉक्टर आनंदीबाई जोशी आता मोठ्या पडद्यावर

टीम महाराष्ट्र देशा : देशाच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहेत. झी स्टुडीओज प्रस्तुत ‘आनंदी गोपाळ’ हा चित्रपट 15 फेब्रुवारी 2019 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन समीर विद्वांस यांनी केलं आहे.

नुकतंच या चित्रपटाचं एक टीझर पोस्टर आलं आहे. ‘ज्या देशास माझ्या धर्मासकट मी मान्य नाही, तो देश मला मान्य नाही’ हे उद्गार लिहिलेल्या या पोस्टरवर आनंदीबाई जोशी यांचं पोर्ट्रेट दिसत आहे. या चित्रपटातील प्रमुख भूमिका कोण करणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. हा चित्रपट 15 फेब्रुवारी 2019 रोजी प्रदर्शित होणार आहे.