‘हाथरसच्या घटनेवर अश्रू अनावर झाले, मग पुण्याच्या घटनेवर गप्प का?”

पुणे : बिबवेवाडी परिसरात एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची निर्घुण पद्धतीने हत्या केल्याप्रकरणी सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. पीडित मुलगी नियमितपणे कब्बडीचा सराव करण्यासाठी संध्याकाळी येथे आली होती. त्याच वेळी तिथे आलेल्या तीन नराधम तरुणांनी तिच्यावर कोयत्याने वार करत तिचा खून केला. सध्या या धक्कादायक घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भाजप नेत्या चित्र वाघ यांनी प्रियांका गांधी यांच्यावर टीका केली आहे.

चित्र वाघ यांनी प्रियांका गांधी यांना ट्विट करत म्हंटल्या की, ‘हाथरसच्या घटनेवर तुम्हाला अश्रू अनावर झाले मग पुण्याच्या घटनेवर गप्प का?, पुण्यातील ज्या तरुणीची हत्या झाली ती तुमच्या मुलीसमान नाहीये का? फक्त निवडणुका लागलेल्या उत्तर प्रदेशातच तुमच्या संवेदना जागृत होतात का?, असा प्रश्न चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.

काय आहे प्रकरण? 

पिडीत मुलगी मुलगी इयत्ता आठवीत शिकत होती. हत्या करणारा आरोपी हा मृत मुलीचा नातेवाईक होता. आरोपीसोबत अन्य दोन व्यक्ती होत्या. मुलगी बिबवेवाडी परिसरात कबड्डीचा सराव करत होती. यावेळी मुख्य आऱोपी आणि इतर दोघे तिच्याजवळ आले. यातील एकाने तिच्यावर कोयत्याने अचानकपणे वार करायला सुरुवात केली. थेट मानेवर वार झाल्यामुळे काही समजायच्या आत मुलगी जमिनीवर कोसळली. त्यानंतर आरोपीने फक्त मानेवरच आणखी वार केले. आरोपीने अत्यंत अमानुषपणे मुलीचा खून केला.

महत्वाच्या बातम्या