कोरोनावर मात करुन टीम इंडियाचा ‘स्पायडर मॅन’ परतला; बीसीसीआयने दिली माहिती

मुंबई : इंग्लंड दौऱ्यातील डब्ल्युटीसी सामना गमावल्यानंतर भारतीय संघाचे खेळाडू हे २० दिवसाच्या सुटीवर गेले होते. या दरम्यान इंग्लंडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढतच होता. यादरम्यान भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला कोरोनाची लागण झाली होती.

इंग्लंड दौऱ्यातील डब्ल्युटीसी स्पर्धेंच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय संघ सुटीवर गेला होता. यादरम्यान रिषभ पंतने युरोकप स्पर्धेच्या काही सामन्याला हजेरी लावली होती. यावेळी त्याने मास्क परिधान केल्याचे दिसुन येत होते. काही दिवसातच त्याला कोरोनाची लागण झाली. उपचारानंतर १८ जुलै रोजी त्याचा विलगीकरणाचा कालावधी संपुष्टात आला.

मात्र अद्यापही रिषभ पंतने भारतीय संघाच्या बायोबबलमध्ये प्रवेश केला नव्हता. मात्र २२ जुलै रोजी बीसीसीआयने ट्विट करत रिषभ पंत संघात परतला आहे अशी माहिती ट्विट करुन दिली आहे. यामुळे आगामी २८ जुलै पासुन सुरु होणाऱ्या सराव सामन्यात तो सहभागी होऊ शकतो. तसेच ५ ऑगस्टपासुन सुरु होणाऱ्या इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठीही तो उपलब्ध असेल.

महत्त्वाच्या बातम्या

IMP