टीम इंडियाचा नवा ऑलराऊंडर ; हार्दिकची जागा घेणार ‘हा’ खेळाडू

हार्दिक

मुंबई : आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर पुढच्या महिन्यात होणारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेची फायनल आणि त्यानंतर होणाऱ्या भारत-इंग्लंड मालिका होणार आहे. या दोन्ही मालिकेसाठीच्या टीम इंडियाची (शुक्रवारी) निवड करण्यात आली.

रवींद्र जाडेजा व हनुमा विहारी या दोघांचे टीम इंडियाच्या कसोटी संघात पुनरागमन झाले असून हार्दिक पांडय़ा व कुलदीप यादव या दोघांनाही या संघात स्थान देण्यात आलेले नाही ‘हार्दिक सध्या गोलंदाजी करण्याच्या स्थितीत नाही. इंग्लंडविरुद्ध गोलंदाजीचे ओझे हाताळण्यासाठी त्याला संघात घेण्यात आले होते, मात्र तो प्रयोग फसला.’ त्यामुळेच कसोटी संघात त्याचा विचार झालेला नाही.

हार्दिकची जागा ठाकूर घेऊ शकतो असे मत भरत अरुण यांनी व्यक्त केलं आहे. ते म्हणाले,  शार्दुल ठाकूरकडे वेगवान गोलंदाजीत अष्टपैलुत्व सिद्ध करण्याची क्षमता आहे. हार्दिक पांड्या पाठीच्या दुखण्यामुळे गोलंदाजी करू शकत नव्हता, त्यावेळी शार्दुल मदतीला धावून आला. ठाकूरने स्वत:ची उपयुक्तता सिद्ध केली आहे आणि तो अष्टपैलू बनू शकतो, हे शार्दुलने प्रत्यक्षात खरे ठरविले आहे.

दोन कसोटी सामन्यांचा अनुभव असलेल्या शार्दुलने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ब्रिस्बेन कसोटीत अर्धशतकी खेळी केली. शिवाय सात गडी बाद केले होते. आम्हाला गोलंदाजीत अष्टपैलू शोधण्याची गरज आहे. नियमितपणे भारतीय संघासोबत वास्तव्य असल्याने मी स्वत: स्थानिक सामन्यात अशा खेळाडूंचा शोध घेऊ शकत नाही. शार्दुलला इंग्लंड दौऱ्यात पुरेशी संधी मिळणार असल्याने गोलंदाजी अष्टपैलू म्हणून त्याच्या प्रतिभेत आणखी भर पडेल, अशी अपेक्षा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP