टीम इंडियाचे ‘हे’ दोन खेळाडू न्यूझीलंडवर पडणार भारी, वॉर्नरचं भाकीत

team india

इंग्लंड : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) च्या अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाने शुक्रवारीपासून साऊथॅम्प्टनमध्ये सराव सुरु केला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना 18-22 जून दरम्यान साऊथॅम्प्टन येथे होणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या टेस्ट मॅचबद्दल अनेक दिग्गज खेळाडूंनी भविष्यवाणी केली आहे. ऑस्ट्रेलियाचा आक्रमक बॅट्समन डेव्हिड वॉर्नर याने देखील या फायनलबद्दल भाकीत व्यक्त केले आहे.

डेव्हिड वॉर्नर टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजावर खूप प्रभावित झाला आहे. वॉर्नरने जडेजाच्या गोलंदाजीचे कौतुक केले आहे. जडेजाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) च्या अंतिम सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले जावे, असेही तो म्हणाला आहे. वॉर्नर म्हणाला की, जडेजा आणि अश्विन एकत्र कीवी फलंदाजांना त्रास देऊ शकतात.

जाडेजाने गेल्या दोन वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजी आणि फलंदाजींनी चमकदार कामगिरी केली आहे. डब्ल्यूटीसीमध्ये भारताच्या कामगिरीमध्ये त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. जडेजाने डब्ल्यूटीसीमध्ये 10 सामने खेळले. त्याने 58.62 च्या सरासरीने 469 धावा केल्या. इतकेच नाही तर जडेजानेही शानदार गोलंदाजी केली आहे. त्याने 28 विकेट्स घेतल्या आहेत.

वॉर्नर पुढे म्हणाला की, मला वाटते की (किवी फलंदाज) त्या दोन फिरकीपटूंवर नाराज होतील. डेव्हिड वॉर्नरने ‘स्पोर्ट्स टुडे’ शी बोलताना राहुल द्रविडचे देखील कौतुक केले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची भारताची मालिका आठवताना वॉर्नर म्हणाला की, कर्णधार (कोहली) ज्याच्या गैरहजरीत युवा खेळाडूंनी पुढे येऊन आमच्याविरुद्ध उत्तम कामगिरी बजावली त्यामुळे मला वाटते की टीम इंडिया एक बलवान टीम आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP