शुभमन गील नंतर टीम इंडियाचा ‘हा’ खेळाडू जखमी, इंग्लंड दौऱ्यातुन बाहेर

मुंबई : इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाने डब्ल्युटीसी स्पर्धेचा अंतिम सामना गमावला. या सामन्यानंतर काही दिवसात सलामीवीर शुभमन गील दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला. तो भारतात परतल्यानंतर भारतीय संघाच्या आणखी एका खेळाडूला दुखापत झाल्याने इंग्लंड दौऱ्यातुन माघार घ्यावी लागत आहे.

इंग्लंड दौऱ्यावर राखीव खेळाडू म्हणून गेलेला आवेश खान दुखापतग्रस्त झाल्यामुळे इंग्लंड दौऱ्यातून बाहेर पडला आहे. डरहम येथे सुरु असलेल्या सराव सामन्यात त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली. या दुखापतीमुळे त्याला सराव सामना अर्धवट सोडावा लागला. तसेच या दुखापतीमुळे तो इंग्लंड दौऱ्यातुनही बाहेर पडला असल्याची शक्यता आहे.

इंग्लंड दौऱ्यावर आवेश खानची निवड राखीव खेळाडू म्हणून केली होती. येत्या ५ ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका सुरु होणार आहे. मात्र त्याच्या दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघात एक नेट गोलंदाज कमी असेल. त्याच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्यामुळे निदान एक महिना त्यावा गोलंदाजी करता येणार नाही असे बीसीसीआयकडुन कळवण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP