टीम इंडियाला मिळणार तीन आठवड्यांची विश्रांती, कारण…

टीम इंडिया

मुंबई : आयपीएल स्थगितीनंतर आता संपुर्ण क्रिकेट जगताचे लक्ष आता आगामी जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्याकडे लागले आहे. येत्या १८ ते २२ जुन दरम्यान हा सामना भारत आणि न्युझीलंड दरम्यान होणार आहे. या सामन्यासाठी भारत आणि न्युझीलंडचा संघ इंग्लंडमध्ये पोहोचले आहे.

टीम इंडिया जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना व इंग्लंडविरुद्धची पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यामुळे भारतीय संघाला बराच काळ काळ जैव सुरक्षित वातावरणात रहावे लागणार आहे. अशा वेळी त्यांच्या मानसिकतेवर कोणताही परिणाम होऊ नये म्हणून भारतीय संघाच्या व्यवस्थापनाने टीम इंडियातील क्रिकेटपटूंना दोन मालिकांदरम्यान तीन आठवडय़ांची विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 18 ते 22 जून या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर भारत-इंग्लंड यांच्यामधील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला 4 ऑगस्टपासून प्रारंभ होईल. या दोन मालिकांदरम्यान टीम इंडियाला ब्रेक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP