fbpx

वर्ल्ड कपमधील पराभवानंतरही टीम इंडियाला मिळणार ‘इतकी’ रक्कम

टीम महाराष्ट्र देशा : वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलमध्ये भारतीय संघाचा पराभव करत न्यूझीलंडने फायनल गाठली आहे. त्यांचा सामना आता यजमान इंग्लंडशी होणार आहे. टीम इंडियाचा पराभव झाला असला तरीही टीम इंडियावर बक्षिसांचा वर्षाव होणार आहे.

वर्ल्ड कप २०१९ साठी आयसीसीने यावेळी ७० कोटींचं बक्षीस जाहीर केले आहे. या ७० कोटींपैकी भारतीय संघाला साडे सात कोटी रुपये मिळतील. आयसीसीच्या नियमानुसार, सेमीफायनलपर्यंत मजल मारणाऱ्या म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर राहणाऱ्या संघाला ५.५ कोटी रुपये बक्षीस दिलं जातं. लीग फेजमध्ये एका सामन्यासाठी विजेत्या संघाला २८ लाख रुपये दिले जातात, तर सामना रद्द झाल्यानंतर हे बक्षीस १४-१४ लाख रुपये असं दिलं जातं.

दरम्यान, टीम इंडियाला वेगवेगळ्या आधारावर ७.६० कोटी रुपये मिळतील. तसेच अंतिम सामना जिंकणाऱ्या संघाला २८ कोटी आणि उपविजेत्याला १४ कोटी रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.