आयसीसीच्या क्रमवारीत तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडिया अव्वल क्रमांकावर

team india

मुंबई : येथे भारत-इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला एक डाव आणि २५ धावांनी हरवलं आहे. तर हा सामना जिंकून भारताने मालिका देखील ३-१ ने आपल्या खिशात घातली आहे. याबरोबरच भारताचे जूनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. अंतिम सामन्यात भारताचा सामना न्यूझीलंड विरुद्ध इंग्लड मध्ये लॉर्ड्सवर होणार आहे.

इंग्लंडचा कसोटी मालिकेमध्ये 3-1 ने पराभव केल्यानंतर टीम इंडिया आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. आयसीसीने या कसोटी मालिकेच्या निकालानंतर नव्या क्रमवारीची घोषणा केली. टीम इंडियाकडे या क्रमवारीत 122 गुण आहेत, तर न्यूझीलंडच्या खात्यात 118 गुण आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18 जूनपासून वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे.

एकदिवसीय क्रमवारीत भारतीय टीम 117 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आणि टी-20 क्रमवारीत 268 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय टीम टॉप-3 मध्ये आहे. कसोटी क्रमवारीमध्ये ऑस्ट्रेलिया तिसऱ्या, इंग्लंड चौथ्या, पाकिस्तान पाचव्या, दक्षिण आफ्रिका सहाव्या, श्रीलंका सातव्या, वेस्ट इंडिज आठव्या आणि बांगलादेश नवव्या क्रमांकावर आहे.

महत्वाच्या बातम्या