डे – नाईट कसोटी सामन्याकडे सर्वांचे लक्ष, टीम इंडिया पहिलांदाचं करणार पिंक बॉलचा सामना

blank

टीम महाराष्ट्र देशा : भारतीय क्रिकेट संघ येत्या २२ नोव्हेंबरला ईडन गार्डन मैदानावर बांगलादेश विरुद्ध पहिला डे – नाईट कसोटी सामना खेळणार आहे. यासाठी भारतीय क्रिकेट संघाचे व्यवस्थापकांनी भारतीय संघाच्या प्रशिक्षणासाठी मध्य प्रदेश क्रिकेट संघाबरोबर सामना खेळवण्याची मागणी एमपीसीएकडे केली आहे.

या मागणीला एमपीसीएचे सचिव मिलिंद कानमाडीकर यांनी मान्यता दिली आहे. ते म्हणाले की, खेळाडूंना मदत करण्यास आम्ही पूर्णपणे तयार आहे. या प्रशिक्षणामुळे भारतीय संघाला गुलाबी बॉलने खेळायची सवय होईल. मिलिंद म्हणाले, भारतीय संघाकडून आम्हाला विनंती केली गेली की, रात्री गुलाबी बॉलने प्रशिक्षण मिळावे जेणेकरुन ते बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या डे-नाईट सामन्यासाठी पूर्णपणे तयार राहू शकतील.  भारतीय संघ पहिल्यांदाच डे – नाईट सामना खेळणार आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी या सामन्याच्या दृष्टीने प्रशिक्षण घेणे महत्वाचे ठरणार आहे.

पिंक बॉलबरोबर खेळण्यापूर्वी प्रशिक्षण घेणे फार महत्वाचे आहे, असे मत भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेनेही व्यक्त केले. "मी वैयक्तिकरित्या खूप उत्साही आहे. हे एक नवीन आव्हान आहे. सामना कसा असेल हे मला माहिती नाही, परंतु प्रशिक्षण सत्राद्वारे आम्हाला याची कल्पना येईल. प्रशिक्षणानंतरच आम्हाला याची कल्पना येईल, असे रहाणे म्हणाला आहे.

महत्वाच्या बातम्या