टीम इंडियानं सर्वांना ‘आत्मनिर्भर’तेचा धडा शिकवला : मोदी

narendra modi

नवी दिल्ली : देशाच्या विकासात युवकांचं योगदान महत्त्वाचं असून युवकांनी देशासाठी धैर्य आणि निष्ठेनं काम करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं. आसाममधल्या तेजपुर विद्यापीठाच्या 18 व्या दीक्षांत कार्यक्रमात ते दुरदृश्य प्रणालीद्वारे विद्यार्थ्याना उद्देशून बोलत होते.

ऑस्ट्रेलियात भारतीय संघानं मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचा हवाला देत मोदी यांनी विद्यार्थांना आत्मनिर्भर होण्याचा सल्ला दिला आहे. मोदी म्हणाले की, अननुभवी आणि दुखापतग्रस्त असेलेल्या संघानं न खचता निर्धार आणि ध्येयानं जगातील सर्वोत्तम संघाचा त्यांच्याच देशात पराभव केला. एकप्रकारे टीम इंडियानं सर्वांना आत्मनिर्भरतेचा धडा शिकवला आहे. आपण सर्वांनी त्यांच्याकडून या गोष्टी शिकायला हव्यात, असं मोदी म्हणाले.

तेजपुर विद्यापीठाची पाळेमुळे इतिहासात रूजली असून ईशान्येकडील राज्यांच्या क्षमतेवर देशाला विश्वास असल्याचं मोदी यांनी यावेळी अधोरेखित केलं. तसंच देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आसामच मोठं योगदान राहिल्याच मोदी यांनी यावेळी सांगितलं.आपल्याला आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवणं आवश्यक असून कठीण परिस्थितीत पराजयाचा विचार न करता विजयासाठीच प्रयत्न केले पाहिजेत असं ते म्हणाले.

सर्वसामान्यांसाठी देशात अनेक योजना राबविण्यात येत असून आसामलाही त्याचा मोठा फायदा झाला असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. विद्यार्थ्यंच शिक्षण पूर्ण झाल्यावर ते देशाच्या उन्नतीचा विचार करून देशाला नवीन उंचीवर घेवून जातील याची खात्री असल्याचं मोदी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या