न्यूझीलंडला हरवण्यासाठी टीम इंडिया सज्ज ; मैदानात उतरताच विराट म्हणाला…

न्यूझीलंड

मुंबई : भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यानंतर बीसीसीआयने भारतीय संघाची इंग्लंड दौऱ्यासाठी घोषणा केली. या दौऱ्यात पहिले भारतीय संघ जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळेल. १८ ते २२ जुन दरम्यान साउथहॅप्मटन येथे भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान ही लढत होईल. यानंतर ऑगस्ट महिन्यात इंग्लंड संघासोबत ५ कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे.

टीम इंडियाला लंडनमध्ये पोहचल्यानंतर ‘साऊथम्पटन येथील एजेज बाऊल या स्टेडियमच्या शेजारील हिल्टन पंचतारांकित हॉटेलमध्ये तीन दिवस सक्तीच्या विलगीकरणात राहावे लागले. टीम इंडियाने मुख्य मैदानात आयसोलेशनच्या तिसऱ्याच दिवशी प्रॅक्टिसला सुरुवात केली.

लंडनमध्ये पोहोचल्यानंतर भारतीय खेळाडूंनी गुरुवारी नेट सरावाला सुरूवात केली. दरम्यान, टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने चेतेश्वर पुजारा आणि शुभमन गिल यांच्यासोबतचा एक फोटो आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. आणि त्या फोटोला एक  कॅप्शन  देखील दिले आहे. ‘सूर्य हास्य फुलवतो,’.

महत्त्वाच्या बातम्या

IMP