शहिदांच्या कुटुंबियांना नक्की किती रक्कम डोनेट करणार भारतीय संघ जाणून घ्या

टीम महाराष्ट्र देशा : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आज होत असलेल्या क्रिकेट सामन्यामध्ये भारतीय क्रिकेट टीम ‘आर्मी कॅप’ सह मैदानात उतरली आहे. क्रिकेटच्या मैदानात यापूर्वी असे चित्र कधीही पाहायला मिळाले नव्हते. भारतीय क्रिकेटर्सने या माध्यमातून भारतीय वायू सेनेला सलाम करत पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. तर भारतीय खेळाडू आजच्या सामन्याचे मानधन पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबांना देणार आहे.

पण भारतीय संघ नक्की किती रक्कम डोनेट करणार असा प्रश्न सगळ्यांना पडला असणार. तर द हिंदूच्या एका रिपोर्ट नुसार एकदिवसीय सामना खेळण्यासाठी खेळाडूला ८ लाख रुपये मिळतात. आणि जे खेळाडू रिजर्व्ह असतात त्यांना अर्धे म्हणजेच ४ लाख रुपये मिळतात. त्यानुसार ११ खेळाडू प्रत्येकी ८ लाख रुपये अशे ८८ लाख आणि ४ रिझर्व्ह खेळाडू यांचे प्रत्येकी ४ लाख रुपये अशे १६ लाख रुपये. अशा मध्ये रांची येथील एका सामन्याचे जवळपास १ कोटी ४ लाख रुपये शहीद जवानांच्या कुटुंबियांना देणार आहे.

दरम्यान, पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यामध्ये भारताला ४० जवान गमवावे लागले. याचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले. शहीद जवानांच्या कुटुंबियांना देशातील लोकांनी भरभरून मदत केली. माजी कर्णधार आणि स्थानिक खेळाडू एम. एस. धोनी यांनी खेळाडूंना या आर्मी कॅप दिल्या. दरम्यान कोहलीने असे सांगितले की, ही एक विशेष कॅप असून हे आर्म्ड फोर्सला श्रद्धांजली आहे तसेच भारतीय संघ तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून मिळालेली आपली संपूर्ण फी शहीदांच्या कुटुंबियांना देण्यात येणार आहे या कार्यामध्ये सर्वांना सामील होण्याचे आवाहन देखील कोहलीने केले.