लॉर्ड्सवर जिंकण्यासाठी ‘टीम इंडिया’ सज्ज

टीम महाराष्ट्र देशा – क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर गुरुवारपासून दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. या मैदानावर इतिहास भारताच्या बाजूने नसला तरी भारतीय संघ यंदा इतिहास बदलण्यासाठी उत्सुक आहे. भारताने या मैदानावर १७ कसोटी सामने खेळले आहेत. त्या सामन्यांपैकी भारताने अवघ्या दोन सामन्यांत विजय मिळवला आहे.

बर्मिंगहॅममध्ये कर्णधार विराट कोहलीला अन्य फलंदाजांची चांगली साथ मिळाली असती, तर मालिकेत टीम इंडियाच आघाडीवर राहिली असती. भारताची ही विजयाची संधी अवघ्या 31 धावांनी हुकली.
लॉर्डस्च्या खेळपट्टीवर दोन दिवसांपूर्वी गवत दिसून येत होते. मात्र, सामना सुरू होण्यापूर्वी ते कमी झालेले असेल, अशी शक्यता आहे. असे जर झाले नाही, तरी खेळपट्टी पूर्णपणे सुकलेली असेल. अशा स्थितीत भारतीय संघव्यवस्थापनाला आपल्या गोलंदाजी आक्रमणाबाबत पुनर्विचार करावा लागेल.

पहिल्या कसोटीत विराट कोहली वगळता एकाही फलंदाजाला आपला ठसा उमटवता आला नाही. त्यामुळे फलंदाजी विभागात बदल होण्याचे संकेत आहेत. यामध्ये शिखर धवन व लोकेश राहुल यांच्यापैकी एकाला बसवून कसोटी स्पेशालिस्ट चेतेश्वर पुजाराला खेळवण्यात येईल असा अंदाज बांधला जात आहे. तसेच गेल्या काही महिन्यांत बॅटमधून धावा निघत नसल्यामुळे उपकर्णधार अजिंक्य रहाणेही दबावाखाली असेल यात वाद नाही.

संघ :
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, करुण नायर, हार्दिक पांड्या, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, ईशांत शर्मा, उमेश यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.

इंग्लंड : जो रूट (कर्णधार), अलिस्टर कूक, कीटोन जेनिग्स, जॉनी बेयरस्टॉ, जोस बटलर, आॅलिव्हर पोप, मोईन अली, आदिल रशीद, जेमी पोर्टर, सॅम कुरेन, जेम्स अॅॅन्डरसन, स्टुअर्ट ब्रॉड आणि ख्रिस व्होक्स.

रोहितचा अनुष्काला मजेशीर सल्ला

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आमच्याकडे बोट दाखवू नये- संजय राऊतLoading…
Loading...