लाजिरवाण्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी टीम इंडिया सज्ज

टीम महाराष्ट्र देशा- चौथ्या एकदिवसीय सामन्यातील लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघ हा सामना जिंकून मालिकेचा शेवट गोड करण्याच्या प्रयत्नात आहे. भारतीय संघाने पहिले तीनही सामने जिंकून मालिका आधीच खिशात घातली आहे. पण, चौथ्या सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारतीय संघाची लक्तरे वेशीला टांगली.

न्यूझीलंडविरुद्धच्या वेलिंग्टनच्या अखेरच्या वन डे सामन्यात खेळण्यास अनुभवी महेंद्रसिंग धोनी पूर्णपणे फिट असल्याचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे अखेरच्या पाचव्या सामन्यात धोनी मैदानावर खेळताना दिसण्याची शक्यता आहे. चौथ्या लढतीत गमावलेली अब्रू परत मिळवण्यासाठी आणि या मालिकेचा विजयी समारोप करण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे.

Loading...

न्यूझीलंडला मोठा धक्का
अखेरच्या वन डे लढतीआधी यजमान न्यूझीलंड संघाला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर फलंदाज मार्टिन गप्टिल दुखापतीमुळे दुखापतीमुळे अखेरच्या वनडे सामन्याला मुकण्याची शक्यता आहे.

दरम्यान, विराट कोहलीच्या अनुपस्थितीत न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचा लाजिरवाणा पराभव झाला. फलंदाजांच्या हाराकिरीमुळं भारताचा डाव अवघ्या ९२ धावांवर आटोपल्यानंतर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी १५ षटकांतच भारतावर विजय मिळवला.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
दिल्लीत मोठ्या थाटात प्रचाराला गेलेल्या तावडेंना केजारीवालांनी बेक्कार झापलं
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
उदयनराजे भोसले यांची निर्दोष मुक्तता