Shoaib Akhtar : टी20 विश्वचषक स्पर्धा T20 World Cup मध्ये झिम्बाब्वेनं पाकिस्तानला एका धावेने हरवल्यानंतर पाकिस्तानचा माजी जलद गोलंदाज शोएब अख्तर याने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे शोएब अख्तर झिम्बाब्वे विरुद्धच्या पराभवानंतर चांगलाच संतापलेला आहे. या सामन्यामध्ये पाकिस्तानला शेवटच्या चेंडूवर पराभवाचे तोंड पहावा लागल्याने शोएब अख्तर संतापला आहे. शोएबने संतापून भारताविरुद्ध एक कटू विधान दिले आहे. तो म्हणाला आहे की, भारत टी 20 विश्वचषक स्पर्धेतून लवकरच बाहेर पडेल. पुढच्या आठवड्यातील उपांत्य फेरीमध्ये भारत पराभूत होऊन मायदेशी परतेल असे शोएब ने म्हटले आहे. भारत काही ‘तीस मार खान’ नाही असेही शोएब म्हणाला आहे.
झिम्बाब्वे विरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये पाकिस्तानला पराभव स्वीकारावा लागल्यामुळे पाकिस्तानी माजी क्रिकेटर शोएब अख्तरने त्याच्या यूट्यूब चैनल वर व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये तो खूप संतापलेला दिसत असून त्याने बराच वेळ वायफळ बडबड केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. दरम्यान शोएबने, आपल्या पाकिस्तानी संघाविरुद्ध एक विधान केलं होतं. त्यामध्ये तो म्हणाला होता की, याच आठवड्यामध्ये पाकिस्तान मायदेशी परत येईल. कर्णधार बाबर आझमला टार्गेट करत तो म्हणाला की, ज्या संघाकडे चांगलं नेतृत्व नाही त्या संघाकडे जिंकण्याची क्षमता देखील नाही.
रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शोएबने संपूर्ण पाकिस्तानी संघाला टार्गेट केल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. कर्णधार बाबर आझमसह पाकिस्तानी संघाचे व्यवस्थापन, फलंदाज, गोलंदाज आणि इतर खेळाडूंनाही शोएबने चांगलचं सुनावलं आहे. तो म्हणाला, मी तुमची पाठराखण नक्कीच करेल पण तुम्ही त्या पद्धतीने खेळता आहात का? तुम्हाला कोणताही संघ भेटवस्तू म्हणून जिंकू देणार नाही तुम्हाला तुमचेच लढावे लागेल. तुम्ही झिम्बाब्वे विरुद्ध हरला आहात असा टोला देखील शोएबने पाकिस्तानी टीमला लगावला आहे.
पाकिस्तानी संघावर टीका केल्यानंतर शोएबने काहीही संबंध नसताना भारताविषयी वायफळ बडबड केल्याचे दिसले आहे. यामध्ये तो म्हणाला आहे की, पाकिस्तानी संघ या आठवड्यात परत येईल पण पुढच्या आठवड्यात भारतीय संघ आपल्या मायदेशी परत जाईल. भारत कोणी ‘तीस मार खान’ नाही असे विधानही त्याने भारतीय संघाबद्दल केले. शोएबने काहीही संबंध नसताना या ठिकाणी भारताचा उल्लेख केला आहे. शोएबच्या या वक्तव्यावरून असे सिद्ध झाले आहे की शोएबला पाकिस्तानच्या पराभव सहन झालेला नसून त्याची जळफाट उडाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Women Cricket | महिला क्रिकेट खेळाडूंसाठी BCCI ने घेतला ऐतिहासिक निर्णय
- Uddhav Thackeray | C-295 प्रकल्पावरून ठाकरे गटाचा शिंदे सरकारवर हल्ला, म्हणाले…
- Karuna Munde | अजित पवार आणि फडणवीसांच्या शपथविधीचे प्लॅनिंग धनंजय मुडेंनी केले – करुणा मुंडे
- Uday Samant | “C-295 प्रकल्प वर्षभरापूर्वीच…”; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
- Breaking News | महाराष्ट्रात होणारा आणखी एक प्रकल्प गुजरातला, 22 हजार कोटींचा C-295 प्रकल्प वडोदऱ्यात