fbpx

भारतीय संघाला ७१ वर्षाचा इतिहास मोडण्याची संधी.

टीम महाराष्ट्र देशा : बोर्डर – गावस्कर कसोटी मालिकेच्या चौथ्या सामन्यात भारताने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.कारण दुसऱ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलिया संघ बिनबाद २४ धावांवर असून ऑस्ट्रेलियन संघ हा  ५९८ धावांनी पिछाडीवर आहे. भारताने सामन्याच्या दुसऱ्यादिवशी पहिला डाव ७ बाद ६२२ धावांवर घोषित केला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला ६२२ धावांचा डोंगर पार करावा लागेल. तसेच भारताने ऑस्ट्रेलियात ७१ वर्षात एकदाही कसोटी मालिका जिंकलेली नाही. त्यामुळे भारताला इतिहास मोडण्याची ही संधी असल्याचे देखील म्हंटले जाते.

भारतीय संघाने पहिल्यादिवशी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली आणि संपूर्ण दिवस खेळून काढला. प्रथम दिवसाखेर पर्यंत भारतीय संघ ४ बाद ३०३ अशा मजबूत स्थितीत होता. दुसऱ्या दिवशीची सुरवात चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारीने केली. त्यानंतर हनुमा विहारी हा ४१ धावांवर बाद झाला. तर चेतेश्वर पुजाराने ऋषभ पंतच्या साथीने आपली द्विशतका कडे वाटचाल सुरु ठेवली पण पुजाराला द्विशतक पूर्ण करता आले नाही. पुजारा १९३ धावांवर बाद झाला. ऋषभ पंतने मात्र आक्रमक खेळीने १५९ धावा केल्या . रवींद्र जडेजा ने देखील या सामन्यात ८१ धावा केल्या. त्यानंतर जडेजाच्या विकेट नंतर कोहलीने डाव घोषित केला व ऑस्ट्रेलीयन संघाला फलंदाजीस संधी दिली.

आता सामन्याचे फक्त ३ दिवस शिल्लक असल्याने ऑस्ट्रेलिया संघाला अजून ५९८ धावांची आघाडी पार करून भारतीय संघाला पुन्हा एकदा बाद करावे लागेल. त्यामुळे हा सामना एकतर भारत तरी जिंकेल किंवा अनिर्णित राहू शकतो.

पहिल्या आणि दुसऱ्या दिवशीचा भारताचा खेळ बघता भारताचे सामन्यावर वर्चस्व असल्याचे दिसून येते. तसेच भारताने ऑस्ट्रेलियात ७१ वर्षात एकदाही कसोटी मालिका जिंकलेली नाही. त्यामुळे भारताला इतिहास मोडण्याची ही संधी असल्याचे देखील म्हंटले जाते.