केदार जाधवच्या पुण्यातील घरी टीम इंडियाला मेजवानी

team ind

पुणे: भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू केदार जाधवने टीम इंडियाला आपल्या पुण्यातील घरी आमंत्रित केलं होतं. यावेळी जाधव कुटुंबियांनी कर्णधार विराट कोहलीसह भारतीय संघाला खास महाराष्ट्रीय पदार्थांची मेजवानी दिली.यावेळी जाधव कुटुंबियांच्या आदरतिथ्याने कोहली आणि टीम इंडिया भारावून गेली.

Loading...

Kedar-jadhav-

टीम इंडियामधील खेळाडूंची छबी टिपण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चाहत्यांची गर्दी केदार जाधव राहत असलेल्या कोथरुड मधील सिटीप्राईड जवळील पॅलॅडियम या निवासस्थानाजवळ झाली होती. त्यामुळे येथे काही काळ ट्राफिक जामही झाले होते.

भारत-न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वन डे सामना उद्या (25 ऑक्टोबर) पुण्यातील गहुंजे स्टेडियममध्ये होणार आहे. त्यासाठी टीम इंडिया काल पुण्यामध्ये दाखल झाली. तेव्हा केदार जाधवनं टीम इंडियाला आपल्या नव्या घरी भोजनासाठी बोलावलं होतं.

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...