इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील वन डे अणि टी ट्वेन्टी मालिकेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. यात या टीमचा कर्णधार म्हणून विराट कोहली याची निवड झाली असून युवराज सिंग यालाही यावेळी संधी देण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्या खेळाकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

टेस्ट सामन्यांमधील विराट कोहली याची कर्णधार म्हणून कामगिरी पाहता त्याला आता वन डे आणि टी-ट्वेन्टी संघाच्याही कर्णधारपदाची धुरा देण्यात आली आहे. नुकताच महेंद्र सिंग धोनी याने वन डे संघाच्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे विराटकडे सर्वांचे लक्ष असेल. एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील सीनियर निवड समितीच्या बैठकीत भारतीय संघ जाहीर करण्यात आला.

इंग्लंड विरूद्ध खेळल्या जाणा-या वन डे सामन्यांसाठी टीम इंडियामध्ये विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, के.एल, राहुल, महेंद्र सिंह धोनी, मनीष पांडे, केदार जाधव, युवराज सिंग, अजिंक्य रहाणे, हार्दीक पंड्या, आर. अश्विन, अमित मिश्रा, भुवनेश्वर कुमार, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमरा, उमेश यादव यांची निवड करण्यात आली आहे.

तर टी-ट्वेंटी सामन्यांसाठी विराट कोहली (कर्णधार), महेंद्र सिंह धोनी, मनदीप सिंह, युवराज सिंग, के.एल. राहुल, ऋषभ पंत, हार्दीक पंड्या, आर. अश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, सुरेश रैना, मनिष पांडे, भुवनेश्वर कुमार, आशिष नेहरा.

You might also like
Comments
Loading...